जिन्सीत घरफोडी; सोने, चांदी मोबाईल लंपास

Foto
 बंद घर फोडून चोरट्यानी घरातील सोने चांदीच्या दागिन्यासह मोबाईल असा 50 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना जिन्सी मधील संजयनगर गल्ली क्र-1 मध्ये घडली. आसाराम मोहन चव्हाण वय-35 (रा.संजयनगर, जिन्सी) यांचे दि.7 व दि.8 ऑगस्ट दरम्यान यांचे घर बंद होते. हीच संधी साधून चोरट्यानी घराचा कडी कोंडा तोडून घरातील लहान मुलांचे सोने चांदी चे दागिने व मोबाईल असा सुमारे 50 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केला.या प्रकरणी जिन्सी ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.